स्वप्ना कुलकर्णी यांनी आपल्या आयुष्याच्या आतपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये संशोधन, व्यवस्थापन आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातुन समाजमनावर जबरदस्त असा ठसा उमटवला आहे. इंजिनिअरिंगमध्ये केलेल्या संशोधनाच्या माध्यमातुन अनेक देशातल्या विकासावर चर्चा घडवून आणून तो विकास आपल्या देशाच्या दृष्टीने छान पद्धतीने रुजवला कसा जाईल यासाठी एक विचार पुढे घेऊन स्वप्ना यांनी आपल्या राज्यभरामध्ये चालविलेला वैचारिक लढा आणि कृतिशील काम आज नोंद घेण्यासारखे झालेले आहे. योगामध्ये रुची ठेवणार्या स्वप्ना यांनी अनाथ मुले, मुलींच्या शिक्षणासाठी आणि वाडी तांड्यावर असलेल्या गावकुसातील महिलांसाठी उभारलेली सामाजिक सेवा आज सगळीकडे नवरूप धारण करत आहे. सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या सक्सेस पासवर्ड या खास शो मध्ये स्वप्ना कुलकर्णी यांनी आपला संपूर्ण प्रवास व्यक्त केला आहे. जाणून घेऊया आज स्वप्ना कुलकर्णी यांच्यासोबत 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'
⏩ नक्की बघा 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'